सोलापूर दि. 4 : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान च्यावतीने विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची परंपरे प्रमाणे एकच १९ एप्रिलला मिरवणूक व्हावी यासाठी पोलिस आयुक्त यांनी दोन्ही मध्यवर्तीची सयुक्त बैठक घेऊन त्यांच्या समस्या ऐकुण त्याच निराकरण करुन एक मिरवणूक करण्यासाठी तयार करावे आशयाचे निवेदन त्यांच्याशी फोनवर चर्चा करून API बोधे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.

दोन्ही मध्यवर्तींच्या अध्यक्षांना ॲड लौकिक इंगळे व नागेश इंगळे यांनाही तुमच्या कार्यकाळात एक मिरवणूकीच्या पंरपरेला छेद देत दोन मिरवणूका होवू नये यासाठी दोघांनी आपल्या विश्वस्तांना बोलून एक मिरवणूक करण्यासाठी तयार करावे असे निवेदन देण्यात आले.

यावेळी संस्थापक देवा उघडे अध्यक्ष आकाश इंगळे सचिव कांत उघडे तसेच राज सुरते ,ॲड अजय रणशृगांरे,सचिन वाघमारे,राज भोसले,शिलवंत काळे,युवराज बडेकर,शिल भोसले, मुरत निकंबे,शिलरत्न दुड्डे, मिनाज शेख,अतिश वाघमारे,आनंद माने,महेंद्र कांबळे,रोहन बनसोडे,विरसेन जाधव,दयानंद गायकवाड,आंनद माने,विशाल शेवाळे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
