मोहोळ दि. 29 : भीषण अपघातात जीव गमावलेल्या दि. प्रज्ञा धनाजी कोकाटे यांच्या घरी प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या वडिलांची भेट आमदार राजु खरे यांनी घेतली. या अपार दुःखात मनापासून सांत्वन केले.

शब्द अपुरे पडतील असे हे दुःख असून, या वेदनेसमोर कोणतीही मदत अपुरीच आहे, असे आमदारांनी सांगितले.दि. प्रज्ञा कोकाटे यांचे वडील धनाजी कोकाटे यांना ₹५०,००० आणि दि. स्नेहल काशिनाथ वाघमोडे यांचे वडील काशिनाथ वाघमोडे यांना देखील ₹५०,००० इतकी आर्थिक मदत दिली. हा आधार त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकणार नाही, मात्र या कठीण काळात ते एकटे नाहीत, ही भावना पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे ही आमदार खरे यांनी म्हटले.

ईश्वर कोकाटे व वाघमोडे कुटुंबियांना या असह्य दुःखातून सावरण्याची शक्ती देवो आणि त्या निष्पाप आत्म्यांना चिरशांती लाभो, हीच प्रार्थना, असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
