सांगोला दि. 28 : सांगोला महाविद्यालय, यांच्यावतीने आयोजित शिवणे (ता. सांगोला) येथील NSS शिबिरामध्ये “सशक्त महिला – समृद्ध कुटुंब, सक्षम समाज” या विषयावर विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांच्याशी डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी संवाद साधला.
यावेळी महिलांनी आत्मनिर्भर होऊन समाजविकासात महत्त्वाची भूमिका बजावावी असे मत डॉ. कांबळे यांनी व्यक्त केले.
या सत्राच्या अध्यक्षस्थानी छाया संभाजी घाडगे होत्या. प्र. प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. रेणुकाचार्य खानापुरे, डॉ. सदाशिव देवकर, डॉ. विद्या जाधव, डॉ. तानाजी यादव, प्रा. राहुल गोडसे आणि प्रा. तेजस्विनी मिसाळ यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.
