सोलापूर दि. 24 : सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे 46 वे वार्षिक अधिवेशन रविवार दि. 28 डिसेंबर 2025 रोजी हरिभाऊ शिंदे सार्वजनिक वाचनालय, अरण (ता. माढा जि. सोलापूर)च्या सहकार्याने “यशोदा गुरुकुल सभागृह” येथे आयोजित करण्यात येत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी आमदार अभिजीत पाटील राहणार आहेत.
दिनदर्शिकचे प्रकाशन डॉ. गजानन कोटेवार, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ यांचे हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रा. डॉ. बी.पी. रोंगे (संस्थापक, स्वेरी, गोपाळपूर, पंढरपूर), वसंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष, अशोक गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, मुंबई, शालिनी इंगोले, सहाय्यक ग्रंथालय संचालक, पुणे, सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सोलापूर, भारत (आबा) शिंदे, माजी सभापती जि.प. सोलापूर, शिवाजी कांबळे माजी सभापती जि.प. सोलापूर, बाळासाहेब पाटील माजी पं.स. सदस्य, कुंडलिक मोरे, माजी ग्रंथनिवड समिती सदस्य, महाराष्ट्र शासन, सोपानराव पवार प्रमुख कार्यवाह, म.रा.ग्रं. संघ, गुलाबराव पाटील, कार्याध्यक्ष म.रा.ग्रं. संघ, प्रमोद पाटील, तांत्रिक सहाय्यक जि.ग्रं.अ. कार्यालय, सोलापूर, मेकले, कार्योपाध्यक्ष म.र.ग्रं.संघ, भिमराव पाटील कोषाध्यक्ष म.रा.ग्रं.संघ इ. उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात प्रेरणादायी वक्ते सुभाष रणदिवे हे “ग्रंथालय- समाज प्रबोधनाचे प्रभावी माध्यम” याविषयावर व्याख्यान देणार आहेत. प्रतिनिधीच्या अडी अडचणी ऐकून घेवून शासकीय अधिका-यांसमवेत त्यांचे निवारण करण्यात येणार आहे. खुल्या अधिवेशनात विविध विषयाचे ग्रंथालय संबंधीचे ठराव पारीत करुन शासनाकडे पाठविण्यात येणारे आहे.अधिवेशनस्थळी सायं. 5 वा. सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ सोलापूरची वार्षिक सर्व साधारण सभा होणार आहे. अधिवेशनास ग्रंथालयाचे 2 प्रतिनिधी उपस्थितपैकी 1 सेवक असणार आहे.
सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाची सार्वजनिक वाचनालयाची संस्था वार्षिक सभासद वर्गणी स्वीकारली जाणार आहे. प्रतिनिधींची चहा, अल्पोपहार, जेवण इ. व्यवस्था अधिवेशनस्थळी करण्यात आलेली आहे. या अधिवेशनास सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य सभासद, शासनमान्य सार्वजनिक वाचनालयाचे प्रतिनिधी, साहित्यिक इत्यादींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष ग्रंथमित्र मा. प्रा. हरिदास रणदिवे, संघाचे अध्यक्ष विजयकुमार पवार, कार्यवाह, साहेबराव शिंदे, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे आणि कार्यकारी मंडळांनी केले आहे.
