सोलापूर दि. २३ वंचित बहुजन आघाडी, सोलापूर शहरच्या वतीने आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी आणि पक्षाचा निर्धार स्पष्ट करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांची विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲड. प्रकाश (बाळासाहेब) आंबेडकर हे राज्यातील सद्य राजकीय स्थितीवर भाष्य करणार आहेत, तसेच सोलापूर जिल्ह्यातील आगामी रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
- दिनांक: गुरुवार, २५ डिसेंबर २०२५
- वेळ: सकाळी. १०.३० वाजता
- स्थळ: हॉटेल एलाइट, मल्लिकार्जुन मंदिरासमोर, सोलापूर.
