सोलापूर दि. 22 : विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशाला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. समर्थ दत्तात्रय मनूकर (डीएव्ही कॉलेज ऑफ कॉमर्स,क्रीडा प्रमुख), तसेच विवेककुमार मिस्कीन (स्पोर्ट कोच) माननीय मनोजकुमार जिंदम ( स्पोर्ट कोच) हे लाभले.

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माता सरस्वती, संस्थेचे आधारस्तंभ दिवंगत विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या प्रतिमा पूजनाने आणि क्रीडांगणाच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक माननीय सतीश मल्लाव सर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात सरांनी शाळेच्या यशाची परंपरा सांगून व्यक्तिमत्व जडणघडणीत खेळाचे महत्व अनन्यसाधारण असते पटवून दिले.

अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक सतीश मल्लाव सरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर अज्ञानाचा तिमिर नष्ट करून , खेळाडूना ऊर्जा देणारी ज्योत पेटवून आणि हातात ध्वज घेऊन पाहुण्यांना खेळाडूंनी मानवंदना दिले.

शिवकालीन मर्दानी खेळ, दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिक खेळाडूंनी केले. त्याचबरोबर पाहुण्यांच्या हस्ते नाणेफेक करून मुलींचा कबड्डी सामन्याचे सादरीकरण करण्यात आले.
प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. समर्थ मुनेकर सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करताना मी कसा घडलो, शाळेचे जीवनातील महत्त्व, क्रीडा उत्सवाचे महत्त्व सांगून कोठे परिवार विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांचे आभार मानले. सरांना सत्कार करताना जे रोप दिले ते रोप वाढवणार असा शब्दात सरांनी सत्काराला उत्तर दिले.
हा कार्यक्रम प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक
सतीश मल्लाव, मार्गदर्शिका तनुजा मारपल्ली, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्राध्यापक नवनाथ व्हटकर , प्राथमिक विभाग प्रमुख सविता बरबडे , कराटे विभाग जिंदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या कार्यक्रमाला सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय नरुटे सर यांनी केले व राखी कोंगारी मॅडम यांनी मानले.
