सोलापूर दि. 21 : सोलापूर जिल्ह्यात 11 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीत निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपने अल्प प्रमाणात यश संपादन केले. केवळ तीन नगराध्यक्ष निवडून आले.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात तोडफोडीचे राजकारण सुरू केले आहे. परंतु ही पद्धत सोलापूरकरांना रुचली नसल्याचे चर्चा नागरिकांमध्ये आहे.
जिल्ह्यात एकूण 17 नगरपरिषदा आहेत. त्यातील अनगर, अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, मोहोळ, बार्शी, पंढरपूर, अकलूज, सांगोला, मंगळवेढा, कुर्डुवाडी, करमाळा या बारा नगरपरिषदा व एका नगर पंचायतीसाठी मतदान झाले. या निवडणुकीचा निकाल आला आहे.
सोलापूर जिंकण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली होती. त्या दृष्टीने पक्ष प्रवेश सुरु होते. अखेर अल्प प्रमाणात यश मिळालं आहे.
