• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा; सर्व ताकद देऊ : सुनील तटकरे

Lok Pravah by Lok Pravah
December 19, 2025
in Top News, जिल्हा, माझ सोलापूर, राजकारण, राज्य, शहर
0
सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा; सर्व ताकद देऊ :  सुनील तटकरे
0
SHARES
0
VIEWS

मुंबई दि. 19 : सोलापूर महानगरपालिका निवडणूक सक्षम पद्धतीने लढवा, राष्ट्रवादी पक्षाची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी करतो, असे आश्वासन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षसुनील तटकरे यांनी दिले.

सोलापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. तीन दिवसात तब्बल ४१२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्यामुळे उत्साह दुणावला आहे.आणखी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्यात येत आहेत. अनेकांनी तशी इच्छा व्यक्त केल्यामुळे हा आकडा ५०० पार जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुंबईमध्ये कुलाबा येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर,विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आढावा बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष तटकरे बोलत होते.

महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक पातळीवरील इच्छुकांचा सर्व्हे करण्यासाठी टीम येणार आहे. त्यांच्याकडून प्रदेशला अहवाल येईल. त्यानंतर उमेदवार निश्चित होतील, असे सांगत स्थानिक पातळीवर महायुती करण्यासंदर्भातला निर्णय संपर्कमंत्री दत्तात्रय भरणे आणि सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे घेतील. तो निर्णय अंतिम मानून निवडणुका जिंकण्यासाठी कामाला लागावे, असेही प्रदेशाध्यक्ष तटकरे यावेळी बोलताना म्हणाले.

सोलापुरात इच्छुकांचा आकडा ४०० पार झाल्याबद्धल सोलापुरातील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. दरम्यान या बैठकीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी सोलापूर महानगरपालिकेसाठी सोलापूरच्या राष्ट्रवादी पक्षाच्या इतिहासात प्रथमच ४१२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना अहवाल सादर केला.

संपर्कमंत्री दत्तात्रय मामा भरणे आणि सह संपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी सोलापुरात जातीने लक्ष घातल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली असून सोलापुरात राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. सोलापुरात राष्ट्रवादी पक्षाला पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सांगत निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच अन्य दिग्गज नेत्याच्या जाहीर सभा होण्यासाठी पक्षाने लक्ष घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी केली.

सोलापुरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज मंडळी आपल्या पक्षात येऊ इच्छितात त्यामुळे पक्षाला आणि महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढण्यास निश्चित त्यांची मदत होईल, असे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी प्रदेश बैठकीत सांगितले. या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा आणि जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले उपस्थित होते.

Tags: ajit pawaranand chandanshivecandidatesElectionlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationncpsolapursunil tatkare

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025