सोलापूर दि.18 : थंडीच्या दिवसांत बेघर व निराधार वयोवृद्धांना आधार देण्याच्या उद्देशाने संभव फाउंडेशनच्या वतीने ‘एक मायेची ऊब’ या उपक्रमात अंतर्गत सोलापूर येथील बेघर निवारा केंद्रात राहणाऱ्या आजी-आजोबांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात थंडीपासून संरक्षण मिळावे, तसेच मायेचा उबदार हात त्यांच्या सोबत राहावा, हा सामाजिक भावनेचा केंद्रबिंदू होता.या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले. यावेळी वयोवृद्धांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.
मान्यवरांनी संभव फाउंडेशनच्या या उपक्रमाचे सामाजिक कार्याचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे समाजात माणुसकीची भावना अधिक बळकट होते, असे मत व्यक्त केले.
संभव फाउंडेशन सामाजिक बांधिलकी जपत गरजू, बेघर व दुर्लक्षित घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, पुढील काळातही अशाच सेवा कार्यातून समाजासाठी योगदान देण्याचा संकल्प संस्थेने व्यक्त केला.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ अंजनाताई गायकवाड नगरविकास संस्थेचे संतोष सोनवणे संभव फाऊंडेशनचे अध्यक्ष आतिश कविता लक्ष्मण, प्रविण मस्के,अजित बनसोडे, बेघर निवारा केंद्राचे अशोक वाघमारे आदींची उपस्थिती होती.
