सोलापुर दि. 15 : जागतिक बुद्धिबळ संघटना, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना, महाराष्ट्र चेस असोसिएशन व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने जी एच रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशन अँड कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशन यांनी चॅम्प चेस स्कूलच्या सहकार्याने पहिल्या जीएच रायसोनी जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा सोलापुरात राजस्व नगर येथील चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट हॉल येथे रविवार दि. २१ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.
सोलापुरात होणाऱ्या सदर रॅपिड आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत रोख दोन लाख रकमेची भरघोस पारितोषिक तसेच एकूण १२५ बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.
रॅपिड आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार सदर स्पर्धा स्वीस लीग पध्दतीने एकूण नऊ फेऱ्यांमध्ये संपन्न होणार असून खेळाडूंना प्रत्येकी १० मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे.
*स्पर्धेत प्रथम येणाऱ्या खेळाडू रु. ३१००० चे रोख पारितोषिक, द्वितीय क्रमांकास २५०००, तिसऱ्या क्रमांकास २००००, चौथ्या क्रमांकास १५०००, पाचव्या क्रमांकास १०००० असे एकूण पंधरा रोख आकर्षक पारितोषिक
* खुल्या गटात देण्यात येणार आहेत. *विविध रेटिंग कॅटेगिरी* मध्ये प्रत्येकी पाच, तसेच ७, ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षाखालील मुले व मुलीना प्रत्येकी पाच तर ज्येष्ठ खेळाडू व २० ते 54 वयोगटातील खेळाडूंना देखील प्रत्येकी दहा पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती कल्पना प्रकाश वेल्फेअर फाउंडेशनचे सचिव भूषण श्रीवास व चैत्राली लॉन्स अँड बँक्वेट हॉलचे मालक सतीश बुरुडकर यांनी दिली.
खेळाडूंच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा एक महत्त्वाचा टप्पा असतो, ज्यामुळे त्यांना जागतिक बुद्धिबळ पटलावर आपले स्थान निर्माण करता येते. या स्पर्धेच्या माध्यमातून सोलापुर जिल्ह्यातील बुद्धिबळपटूंना रॅपिड आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळवण्यासाठी व वाढवण्यासाठी फायदा होणार असल्याचे सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनचे सचिव व चॅम्प चेस स्कूलचे प्रमुख आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड व आयोजन समितीचे सच्चिदानंद सोमण यांनी यावेळी सांगितले.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी -९९६०३७९९१२, उदय वगरे – ८८८८०४५३४४, फिडे पंच अमित टेंभुर्णे – ९५१८५६५८४९, प्रेयस अंबाडे – ८१८०८७४०५८ यांच्याकडे संपर्क साधावा असे सोलापुर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू व आयोजन समितीचे अतुल कुलकर्णी यांनी कळविले आहे.
जलद आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापुर जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, प्रथमेश बुरुडकर, धनंजय बुरुडकर, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड, संतोष पाटील, सौ. दिपाली पुजारी, दिनेश जाधव, युवराज पोगुल, गणेश मस्कले, रोहिणी तुम्मा, भरत वडीशेरला आदींनी केले आहे.
