सोलापूर दि. 10 : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने संतश्री बुरुड केतेश्वर महाराज जयंती दिनानिमित्त कौन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात संतश्री बुरुड केतेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस उपायुक्त आशिष लोकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त आशिष लोकरे यांनी संत बुरुड केतेश्वर महाराज यांनी समाजामध्ये समता बंधुता निर्माण करण्यासाठी कसे प्रयत्न करून समजतील सर्व लोकांना एक करून समतेचा मार्ग दिला त्यावरच सर्व समाजातील लोकांनी आपण सर्व समान आहोत व त्याच्या शिकवणुकीवर आपण आचरण केलं तर नक्कीच आपला समाज देश विकास करेल असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी अजितकुमार खानसोळे, नागनाथ सुरवसे, युवराज आप्पा सुरवसे, संजय वडतिले, अरुण साळुंखे, मारुती साळुंखे, परमेश्वर वडतिले, दशरथ वडतीले, पंडित वडतीले, कृष्णकुमार कुकडे, शिवानंद वडतिले, कृष्णांत साळुंखे,संतोष वडतिले, योगेश वडतीले, विष्णू साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
