सोलापूर दि. 11 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्या विरोधात वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने 16 मार्चला सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाअध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी केले आहे.
वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी संपन्न झाला. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात 2 मार्चला मुंबईला मुद्रा मोदी ते मुजरा मोदी या नावाने आंदोलन करून पंतप्रधान पदाचा राजीनामा मागितला होता. त्याच अनुषंगाने सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
त्याचप्रमाणे गॅस दरवाढीचा निषेध, अमेरिकेचा मंत्री भारतात येऊन गेलेल्या बडबडाचा निषेध, एफस्टिन फाईल मध्ये भाजपाचे तीन मंत्र्यांचे नाव आलेले असून त्यांच्या राजीनामा मागणीच्या संदर्भात, आणि ग्राहकाच्या पूर परवानगी न घेता जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ 16 तारखेला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा व शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. या बैठकीला जिल्हाध्यक्ष व जिल्ह्याचे पदाधिकारी, शहराध्यक्ष व शहरा चे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी चे नेते सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
