सोलापूर दि. 10 : बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूर यांच्या सर्व विश्वस्तांची बैठक सम्राट चौक येथील चित्रा हॉटेल येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पी.आर. बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकिमध्ये बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या विश्वस्त अध्यक्षपदी आनंद चंदनशिवे यांची व तसेच सचिव पदी रॉकी बंगाळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

या बैठकीमध्ये विश्वस्त अध्यक्ष व सचिव निवड करणे व आयत्यावेळेच्या विषयावर चर्चा करणे या दोन विषयावर हि बैठक आयोजित करण्यात आली होती.

हि निवड 3 वर्षांकरीता म्हणजेच 2026 ते 2028 पर्यंत करण्यात आलेली आहे. उर्वरित विश्वस्त कमिटी व त्यांची पूर्वीची पदे त्यामध्ये तसेच ठेवण्यात आलेली असुन या बैठकिमध्ये सोलापूर शहरामधील होणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भिमजयंतीचे नांव भारतभर घेतले जाते अशाच पध्दतीची जयंती साजरी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

सदरच्या बैठकिवेळी खालील पदाधिकारी व विश्वस्त उपस्थित होते.1. बाळासाहेब वाघमारे ( विश्वस्त अध्यक्ष ) -2. आनंद चंदनशिवे ( विश्वस्त ) -3. पी.आर. बनसोडे ( विश्वस्त खजिनदार ) – 4. बाबा बाबरे ( विश्वस्त ) -5. रवि कोळेकर ( विश्वस्त उपाध्यक्ष ) -6. मिलिंद प्रक्षाळे ( विश्वस्त ) -7. गौतम चंदनशिवे ( विश्वस्त ) -8. शांतीकुमार नागटिळक ( विश्वस्त ) -9. सिध्देश्वर पांडगळे ( विश्वस्त ) -10. पप्पु गायकवाड ( विश्वस्त ) -11. बबन शिंदे ( विश्वस्त ) -12. अजित बनसोडे ( विश्वस्त ) -13. अशुतोष नाटकर. ( विश्वस्त ) – 14. विकी शेंडगे ( उत्सव समिती अध्यक्ष ) -15. रॉकी बंगाळे ( उत्सव समिती माजी अध्यक्ष ) -16. सुहास सावंत ( उत्सव समिती माजी अध्यक्ष ) -17. सागर उबाळे ( उत्सव समिती माजी अध्यक्ष ) –18. उमेश रणदिवे ( उत्सव समिती कार्याध्यक्ष ) –19. अयाज दिना – मेंबर ( उत्सव समिती उपाध्यक्ष ) –20. दिपक गवळी ( उत्सव समिती उपाध्यक्ष ) – 21. संदेश कांबळे ( उत्सव समिती उपाध्यक्ष ) –22. अविनाश भडकुंबे ( उत्सव समिती सचिव ) –23. दत्ता शिंदे ( उत्सव समिती खजिनदार )
