मुंबई दि. 6 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्यभूमी, मुंबई येथे अभिवादन केले.

महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी महामानव अभिवादन केले.

आपल्या मुक्तीदात्याला अभिवादन करण्यासाठी देशभरातील भीमसैनिक करोडोंच्या संख्येने चैत्यभूमीवर आला आहे. तसेच राज्यातील सर्व पक्षीय नेते उपस्थित राहत आहेत.

चैत्यभूमी येथे शिवसेना (उबाठा प्रमुख) उद्धव ठाकरे यांनी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव य.आंबेडकर यांची भेट घेतली.
