• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Wednesday, May 27, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 490.35 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर

Lok Pravah by Lok Pravah
February 18, 2026
in Top News, शहर
0
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 490.35 कोटींचा अर्थसंकल्प अधिसभेत मंजूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 18 – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी 490 कोटी 35 लाख 62 हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने दुरुस्तीसह एकमताने मंजुरी दिली. 430 कोटी 74 लाख 98 हजार रुपये इतकी अपेक्षित जमा गृहीत धरून सादर करण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात 59 कोटी 60 लाख 64 हजार रुपयांची तूट दर्शविण्यात आली आहे.

विद्यार्थी विकास, संशोधन आणि नवोपक्रमांना यंदा विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. बुधवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभेची बैठक पार पडली. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी सदस्य सचिव म्हणून काम पाहिले. वित्त व लेखा अधिकारी सीए डॉ. महादेव खराडे यांनी अंदाजपत्रक सादर केले.अंदाजपत्रकाची मांडणी देखभाल-दुरुस्ती, वेतन, ऋण व अनामत, विकास योजना भाग-१ (शासन अनुदान) आणि विकास योजना भाग-२ (विद्यापीठ निधी) अशा पाच टप्प्यांत करण्यात आली. सादरीकरणानंतर सदस्यांनी सविस्तर चर्चा करून काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यानंतर अंदाजपत्रकास एकमताने मंजुरी देण्यात आली.

बैठकीच्या प्रारंभी मागील इतिवृत्तांत कायम करण्यात आला. प्रश्नोत्तराचा तास पार पडल्यानंतर विविध ठरावांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. विद्यार्थी विकास व संशोधनाभिमुख नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रस्थानी असल्याचे चित्र अधिसभेतील चर्चेतून स्पष्ट झाले.

यावेळी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, डॉ. प्रशांत पवार, महादेव कमळे, डॉ. समाधान पवार, सिनेट सदस्य डॉ. बी. पी. रोंगे, डॉ. वीरभद्र दंडे, डॉ. भगवान आदटराव, रोहिणी तडवळकर, यतिराज होनमाने, गणेश डोंगरे, अजित संगवे, चन्नवीर बंकुर, डॉ. जैनोद्दीन मुल्ला, ॲड. उषा पवार, सूरज रोंगे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, माधव देशपांडे आदी उपस्थित होते.

*ठळक तरतुदी*

*शिक्षकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी ‘सीड मनी’ उपक्रमासाठी 35 लाख रुपये.

*मुलींच्या उच्च शिक्षणातील प्रमाण वाढवण्यासाठी ‘मुली शिकवा, समाज घडवा’ उपक्रमासाठी 5 लाख रुपये.

*‘कमवा व शिका’ योजनेसाठी 20 लाख रुपये.

*आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागासाठी विशेष निधी.

*शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेसाठी 20 लाख रुपये.

*विद्यार्थी संशोधन शिष्यवृत्ती आणि 40 गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यासाठी भरीव तरतूद.

*इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेससाठी विद्यापीठ हिस्सा म्हणून 50 लाख रुपये.

*स्पर्धा परीक्षा अभ्यास कक्ष, विद्यार्थी क्षमता संवर्धन कार्यक्रम, नवीन लेखक-प्रकाशक प्रोत्साहन योजना आणि ‘माझे विद्यापीठ’ उपक्रमासाठी विशेष निधी.

Tags: #approved#budget#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#pahsolapuruniversity#solapur#solapur university

Recent Posts

  • जिल्हाधिकारी कार्यालयात ‘नो व्हेक्कल डे’; मंगळवारपासून प्रभावी अंमलबजावणी
  • महापालिका स्थापना दिनानिमित्त महापौरांची कर्मचाऱ्यांना खास भेट : महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ
  • सामाजिक समता सप्ताह : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
  • सामाजिक समता सप्ताह : सोलापूर येथे सात दिवस चालणार कार्यक्रम
  • सोलापुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुक एकच व्हावी : छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठान

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • May 2026
  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025