सोलापूर दि. 18 : माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळ पुणे संचलित देशभक्त हरिनारायण बंकटलाल सोनी महाविद्यालय व सोलापुर चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सोलापुर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर पी. एम. उषा योजना अंतर्गत रविवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता डी. एच. बी. सोनी कॉलेज, सैफुल, विजापूर रोड, सोलापुर येथे १३ व ९ वर्षाखालील मुले व मुलींच्या जिल्हास्तरीय निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
ही स्पर्धा जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार खेळाडूंच्या संख्येनुसार ५ ते ७ फेऱ्यात संपन्न होणार असुन खेळाडूंना प्रत्येकी १० मिनिटे व प्रत्येक चालीला ५ सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. ९ व १३ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील प्रथम येणाऱ्या दोन खेळाडूंची निवड राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार असून ७ व ११ वर्षाखालील मुले व मुलींसाठी उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.
निवड झालेल्या खेळाडूंना प्रत्येकी रु. १००० राज्य स्पर्धा खेळून आल्यानंतर देण्यात येणार असून स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना एकूण ६० बक्षिसे, चषक व मेडल्स देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मधुसूदन करवा, संचालिका डॉ. वासंती अय्यर व प्राचार्या डॉ. आशा रोकडे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. २०० असुन इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी उदय वगरे मो.क्र. ८८८८०४५३४४ व प्रा. सुवर्णा कांबळे मो.क्र. ९८८१६९१७७९ यांच्याकडे संपर्क साधावा असे सोलापुर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर व सचिव आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड, आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त खेळाडू अतुल कुलकर्णी यांनी कळविले आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, नितीन काटकर, प्रशांत गांगजी, गोपाळ राठोड, संतोष पाटील, सौ. दिपाली पुजारी, दिनेश जाधव, युवराज पोगुल, गणेश मस्कले, रोहिणी तुम्मा आदींनी केले.
