मुंबई : अजित पवार यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदी सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून शनिवारी सायंकाळी अगदी साध्या पद्धतीने त्यांचा शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला.
या संपूर्ण कार्यक्रमावर दु:खाचे सावट होते. गांभीर्यपूर्वक दृढकथन करून त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यांच्या रुपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत. शपथविधीपूर्वी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.
