सोलापूर दि. 27 : बहुजन समाज पार्टी च्यावतीने मंत्री गिरीश महाजन यांनी जाणूनबुजून केलेल्या कृतीच्या निषेधार्थ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व भिमाची वाघीण माधवी जाधव यांच्यावर सरकार/ प्रशासन कसलेही दडपण किंवा कारवाई करू नये यासाठी जिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रदेश सचिव ॲड संजीव सदाफुले, आप्पासाहेब लोकरे जिल्हा अध्यक्ष बबलू गायकवाड शहर अध्यक्ष देवा उघडे जिल्हा कार्यालयीन सचिव शिलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, शहर प्रभारी सुहास सुरवसे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष इंद्रजीत वाघमारे, शहर उत्तर प्रभारी नितीन क्षीरसागर, शहर सचिव मिनाज शेख, शहर युवक सचिव सौरभ लोंढे, उत्तर सोलापूर उपाध्यक्ष दत्ता वाघमारे, तसेच बलभीम कांबळे, महेंद्र कांबळे, आकाश इंगळे, प्रविण गायकवाड,रोहन बनसोडे, प्रतिक बुवा लोकरे,सोनु गायकवाड व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
