सोलापूर, दि. 21 : धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर आहे. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांचे ‘हिंद दी चादर’ म्हणजेच ‘भारतभूमीचे कवच’ हे अभिमानास्पद संकल्पना आहे.
श्री गुरु तेग बहादूर यांचा जन्म अमृतसरमध्ये, १६ एप्रिल १६२१ मध्ये शिखांचे सहावे गुरू हरगोबिंद आणि माता नानकी यांच्या कुटुंबात झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरु पदवी प्राप्त झाली, आणि त्यांचे मूळ नाव त्यागमल होते. लहान वयातच त्यांनी युद्धात अतुलनीय शौर्य दाखवल्यामुळे त्यांना ‘तेग बहादूर’ हे नाव मिळाले.
ऐतिहासिक पार्श्वभूमीत्या काळात क्रूर शासकांचे राजवटींमुळे धार्मिक व राजकीय संघर्ष चालू होते. समाजातील मोठा वर्ग अत्याचारांचा बळी ठरला होता, आणि धर्म, संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू होता. श्री गुरु तेग बहादूर यांनी या अशा आव्हानात्मक परिस्थितीत लढा दिला आणि समाजाची चेतना जागवली.
बलिदानश्री गुरु तेग बहादूर यांनी औरंगजेब यांच्या क्रूर राजवटीला आव्हान दिले. त्यांचा संकल्प अखेरपर्यंत मोडला गेला नाही, आणि त्यांनी धर्म व मानवतेसाठी लढत आपल्या प्राणांची आहुती दिली. स्मरण आणि कार्यक्रमयावर्षी त्यांच्या बलिदानाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या शिकवणी आणि बलिदानाचे महत्त्व सर्वत्र पोहोचेल.
श्री गुरु तेग बहादूर यांचे जीवन निर्भयतेचे, धार्मिक स्वातंत्र्याचे आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचे प्रतीक आहे. त्यांचे तत्त्वज्ञान व शिकवणीचे पालन करणे हे प्रत्येकाचं धर्म कर्तव्य आहे. नांदेड येथे दिनांक २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
