• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

‘युवा स्पंदन’ -“कलेतून भारतीय संस्कृती जोपासा : ज्येष्ठ गायक प्रशांत देशपांडे

Lok Pravah by Lok Pravah
January 20, 2026
in Top News, जिल्हा, शहर
0
‘युवा स्पंदन’ -“कलेतून भारतीय संस्कृती जोपासा : ज्येष्ठ गायक प्रशांत देशपांडे
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. २० : ओवी, अभंग, अंगाई गीत, लोकनृत्य आणि लोककलेच्या माध्यमातूनच भारतीय संस्कृती शतकानुशतके जिवंत राहिली आहे. या कलांमुळेच आपली सांस्कृतिक ओळख टिकून आहे. आजच्या नव्या पिढीने या लोककलांची उपासना करून भारतीय संस्कृती जपावी, असे आवाहन ज्येष्ठ गायक व संगीतकार प्रशांत देशपांडे यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित ‘युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव २०२५–२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचा शुभारंभ मंगळवारी विद्यापीठ परिसरात देशपांडे यांच्या हस्ते झाला. उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती.

प्रास्ताविकात विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांची सर्जनशीलता विकसित करणे आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे हा ‘युवा स्पंदन’ महोत्सवामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी बोलताना प्रशांत देशपांडे म्हणाले की, ओवी, अभंग, गीत, संगीत, नृत्य आणि नाट्यकला यांमुळेच भारतीय संस्कृती आज जगभरात महान म्हणून ओळखली जाते. या कला केवळ मनोरंजनाचे साधन नसून संस्कृती जपण्याचे प्रभावी माध्यम आहेत. तरुणांनी या कलेशी नातं जोडावे. आज कलाक्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध असून त्याकडे विद्यार्थ्यांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे.अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी ‘युवा स्पंदन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवातून विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल, तसेच आनंद, समाधान आणि सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण अनुभवता येईल. विद्यार्थ्यांनी कलात्मक आणि मैत्रीपूर्ण वातावरणात या स्पर्धांचा मनापासून आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्घाटन समारंभा नंतर संकल्पना नृत्य, हिंदी व मराठी वक्तृत्व स्पर्धा, सुगमगायन, मेहंदी, समूहनृत्य, फोटोग्राफीच्या स्पर्धा झाल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ममता बोल्ली व प्रा. श्रुती देवळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र वडजे यांनी केले.

Tags: #lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025