सोलापूर, दि. १९ : केंद्र शासनाच्या योजनेतंर्गत CBSE अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ६ वी तील नविन प्रवेश तसेच इ. ७ वी ते ९ वी वर्गातील रिक्त जागांसाठी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अनुसूचित जमाती व आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांनी केले आहे.
प्रवेशासाठी पात्रता- सन २०२५-२६ मध्ये शासकीय/अनुदानित आश्रमशाळा, जिल्हा परिषद, नगरपालिका व शासनमान्यता प्राप्त शाळेत इ. ५ वी शिकणारे अनुसूचित जमाती/आदिम जमातीचे विद्यार्थी. – पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये ६ लाखांपेक्षा कमी असावे. – इ. ७ वी ते ९ वी वर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी सन २०२५-२६ मध्ये इ. ६ वी ते ८ वी शिकणारे विद्यार्थीही पात्र ठरतील.
परीक्षा दिनांक व ठिकाण- प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी होणार आहे. – इ. ६ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११.०० ते १३.०० वाजता परीक्षा.
– इ. ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११.०० ते १४.०० वाजता परीक्षा.
– परीक्षा केंद्र: शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, होटगी, (ता. दक्षिण सोलापूर).
आवश्यक कागदपत्रे- अर्जासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला व उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक.
– अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्या कार्यालयात जमा करणे बंधनकारक.
शाळांची यादी (ठाणे विभाग)1. कांबळगाव, ता. पालघर 2. शेंडेगाव, ता. शहापूर, जि. ठाणे 3. पळसुंडे, ता. जव्हार, जि. पालघर 4. मोखाडा (हिरवे), ता. मोखाडा, जि. पालघर 5. सवणे, ता. तलासरी, जि. पालघर 6. डहाणू (चळणी), ता. डहाणू, जि. पालघर अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे यांना कोणत्याही कारणाशिवाय अर्ज स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार राखून ठेवले आहेत, अशी माहिती सोलापूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे यांनी दिली आहे.
