न्यू दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पालम टेक्निकल विमानतळावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे स्वागत केले.
ते ५ डिसेंबर रोजी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत २३ व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील.
