सोलापूर दि. 14 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेबाबत नागरिकांच्या तक्रारी, सूचना व माहिती तात्काळ प्राप्त व्हावी यासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे यासाठी प्रभागनिहाय संपर्क व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १ ते १३ मधील नागरिकांनी आदर्श आचारसंहितेबाबत कोणतीही तक्रार, माहिती अथवा सूचना असल्यास 9607980100 या क्रमांकावर संपर्क साधावा.
प्रभाग क्रमांक १४ ते २६ मधील नागरिकांसाठी 9607980200 हा स्वतंत्र संपर्क क्रमांक देण्यात आला आहे.
नागरिकांनी निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आढळल्यास तात्काळ संबंधित संपर्क क्रमांकावर माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
