सोलापूर दि. 12 : सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवारांनी भाजपात प्रवेश केल्याची घटना सोलापुरात घडली.

सोमवार दिनांक 12 जानेवारी रोजी प्रभाग क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार तुषार जक्का यांचा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
