सोलापूर दि. 8 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 करिता वंचित बहुजन आघाडीने 22 उमेदवार उभे केले आहेत. प्रभाग क्रमांक 4 मधून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे आहेत. त्यांच्या प्रचारार्थ ‘बहुजन विचार मंच’ने 33500 रुपये पक्ष निधी दिला.
या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव विनोद इंगळे, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा पल्लवी सुरवसे, पुजा धोत्रे, शशांक हिरेमठ हे प्रामाणिक व निष्ठेचे कार्यकर्ते उभे आहेत. अत्यंत गरीब उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 4 हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यातील उमेदवार विजयी होण्यासाठी, प्रचारासाठी 33500 रुपये पक्षनीधी देऊन बहुजन विचार मंचने चळवळीतील कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे.
हा पक्षनीधी बहुजन विचार मंचचे अध्यक्ष आबासाहेब साबळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी बहुजन विचार मंचचे शाम शिंगे सर, रत्नदीप कांबळे सर, वंचित बहुजन महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्ष मंदाकिनी शिंगे, हेमाताई वाघमारे, ज्योतीताई वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते.
