सोलापूर दि. 6 : प्रभाग क्रमांक एक रोड क्रमांक आठ या कामगार स्टाफकडून सोलापूर महानगरपालिका कामगारांच्या वतीने क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची पत्नी माता सावित्रीबाई फुले यांची १९५ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान सोलापूर येथे उत्साहात साजरीकरण्यातआली.

कार्यक्रमात बोलताना भारतीय बौद्ध महासभेचे अण्णासाहेब वाघमारे महणाले, सावित्रीमाई म्हणजे काळजातून बोलणारा आवाज अंधारात दिवा लावणारी नव्या जगाची शिल्पकार शिक्षणाची पायरी. सावित्रीमाई यांनी शिक्षणाला महत्त्व दिले. अंधविश्वासाला थारा देऊ नका. सावित्रीमाई म्हणतात ‘गोट्याला सिंदूर पासून बसवी देवा दगडतो, धोंडे मुले देती नवस पावती लग्न का करती नारी नर’.

हा कार्यक्रम आण्णासाहेब वाघमारे,नागसेन माने, मधुकर सरवदे, सचिन ढेपे सचिन इंगळे आधीच्या उपस्थितीत संपन्न झाला.

कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिका सफाई कामगार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी अभिनंदन गायकवाड,भारत ढाले, संकेत कांबळे, सरु शिंदे, सुमन लगडे, यल्लमा कावल, अशा लोखंडे, प्रिया साखरे, सोनाली नवगिरे, मेघराज गायकवाड, हरी गुड सेलू कृष्णा मुनगल, प्रदीप कांबळे, मदन गायकवाड, अतुल जाधव, बसवराज जमादार, एसआय अजय कोळेकर आदी उपस्थित होते.

