सोलापूर दि. 4 : पुणे आणि सोलापूर येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूर चेस अकॅडमीच्या नविना भरत वडिशेरला, सानिध्य हेमराज जमादार, वेदांत सोमनाथ पांडेकर, साईराज अमर गंभीरे यांनी उल्लेखनीय कामगीरी करत आंतराष्ट्रीय गुणांकन मिळविण्यासाठी असणारा निकष पूर्ण करत क्लासिकल, रॅपिड व ब्लिट्झ अशा विविध प्रकारात आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले.
हिराचंद नेमचंद कॉमर्स कॉलेजच्या नवीना वडिशेरला हिने पुणे येथे झालेल्या स्पर्धेत आकर्षक खेळ करत आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त रुद्र अगरवाल याचा पराभव केला तर मानांकित शिवेंद्रसिंह शिंदे यांच्याशी बरोबर साधत ब्लिट्झ प्रकारात इलो १४५५ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले. नेताजी सुभाष चंद्र बोस इंग्लिश मीडियम स्कूलच्या सानिध्य जमादार याने उत्कृष्टरीत्या खेळत मानांकित प्रेक्ष शहा, निखिल वानखेडेकर, किंशुक श्रीवास्तव, शौर्य मठपती, रियान बोरा, आरव सोमकुवर यांचा पराभव करत स्टँडर्ड प्रकारात इलो १५३४ आणि रॅपिड प्रकारात इलो १४७९ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले.
बार्शीच्या एम.आय. टी. व्ही.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूलच्या वेदांत पांडेकर याने सुरेख खेळ करत मानांकित वैष्णवी पाल हिचा पराभव केला व वैभव पारेकर याच्याशी बरोबरीत साधत रॅपिड प्रकारात इलो १४६२ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले. तसेच सेंट जोसेफ स्कूल बार्शी चा साईराज गंभीरे याने देखील चमकदार कामगीरी करत मानांकित हिमांशू व्हनगावडे, आरुष तुपे, प्रज्वल कोरे यांचा पराभव करत रॅपिड प्रकारात इलो १५२३ आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले.
चॅम्प चेस स्कूल मध्ये शिकत असलेल्या खेळाडूंना त्यांच्या पालकांचे आणि शाळेचे प्रोत्साहन मिळत असुन त्यांना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त उदय वगरे, भरत वडीशेरला, नितीन अग्रवाल तसेच आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक सुमुख गायकवाड यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
खेळाडूंनी संपादन केलेल्या उज्वल यशाबद्दल सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, सोलापुर चेस अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर, नामवंत उद्योजक रवींद्र जयवंत, अतुल कुलकर्णी, नितीन काटकर, गोपाल राठोड, संतोष पाटील, प्रशांत गांगजी, सौ. दिपाली पुजारी डॉ. अनिल कांबळे, गणेश मस्कले, प्रशांत पिसे, विजय पंगुडवाले, नागेश पाटील, रोहित पवार, श्रेयांस शहा, युवराज पोगुल, रोहिणी तुम्मा, जयश्री कोंडा आदींनी कौतुक करत अभिनंदन केले.
