सोलापूर दि. 4 : वंचित बहुजन आघाडीच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ युवा नेते सुजाता आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की सोलापूर शहराला आठ दिवस आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा होतो ही परिस्थिती बदलायची असेल तर वंचितला सत्तेत सहभागी होण्याची संधी द्या.
वंचित ही मुंबईमध्ये काँग्रेस सोबत युती आघाडी करून लढत आहे त्याच पद्धतीने सोलापुरात स्वबळावर 22 जागा लढवीत आहे या सर्व उमेदवारांना सोलापूर येथील नागरिकांनी मतदान करून निवडून द्यावे असे आव्हान त्यांनी यावेळी मतदारांना केले.
सोलापुरातील मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सर्वदे यांच्या हत्ये संदर्भात बोलताना ते म्हणाले सोलापुरातील राजकारण अतिशय खालच्या टोकाला चालले असून निवडणूक काळात खून होणे अतिशय गंभीर बाब आहे. याचा आम्ही निषेध करतो त्याच पद्धतीने कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांनी योग्य प्रकारे सांभाळावी.
