मुंबई दि. 3 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या मनुवाद्यांच्या निषेधार्थ मुंबईत वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाचा महामोर्चा करण्यात आला या मोर्चाला मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

ग्वालियर येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेल्या कथित अपमानाच्या निषेधार्थ आज, शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत एक भव्य व ऐतिहासिक ‘महामोर्चा’ आयोजित करण्यात आला.

या मोर्चामुळे राज्यभरात तीव्र राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया उमटल्या असून, आंबेडकरी चळवळ पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणार आहेत.हा विराट महामोर्चा वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात येणार असून, यामध्ये लाखो कार्यकर्ते आणि अनुयायी भारतीय बौद्ध महासभा मोर्च्यात सहभागी होणार सहभागी झाले.

