मुंबई दि. २९ : सोलापूर शहर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून मुंबई येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित युनिफॉर्म गारमेंट फेअरला तीन दिवसात जवळजवळ ३००० गारमेंट व्यावसायिकांनी भेट दिली. यात बाराशेहून अधिक इतर राज्यातील गारमेंट व्यावसायिकांनी भेट दिली.

सोलापूर गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या वतीने झालेल्या तीन दिवसीय फेअरच्या सांगता समारंभात बोलताना या फेअरमुळे दर्जात्मक युनिफॉर्मसाठी सोलापूरचे नाव सातासमुद्रा पलीकडे घेतले जाईल, असे मत व्यक्त केले.

या फेअरमध्ये १५० हून अधिक स्टॉल धारक सहभागी झाले होते. तसेच यामध्ये हॉस्पिटल, कार्पोरेट, शालेय गणवेश, स्पोर्ट्स सेक्युरिटी गार्ड्स हाऊसकीपिंग पर्यंतचे सर्व युनिफॉर्म गारमेंट प्रदर्शनात प्रदर्शनास होते. याबरोबरच ब्लेझर, टाय, शूज व सर्व पोशाखाना लागणाऱ्या आकर्षक प्रकारच्या बॅचचा प्रदर्शनात समावेश होता.

यावेळी महाराष्ट्र राज्य म्हाडाचे सीईओ संजीव जयस्वाल तसेच मुख्य वित्त व्यवस्थापक अजय सिंग पवार, फेअर चेअरमन अजय रंगरेज, सचिव श्री. श्रीकांत अंबुरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
