• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Monday, March 30, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर महापालिका निवडणूक : अवैध मद्य विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १ कोटीचा मुद्देमाल जप्त

Lok Pravah by Lok Pravah
December 31, 2025
in Top News, जिल्हा, तालुका, शहर
0
सोलापूर महापालिका निवडणूक :  अवैध मद्य विरोधात उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; १ कोटीचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 31 : सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, सोलापूर यांनी जिल्हा परिसरात अवैध देशी/विदेशी मद्य व हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर संयुक्त धडक कारवाई केली. या कारवाईत एकूण रु. ०१ कोटी ११ लाख ८३ हजार ९१५ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. दि. १५ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ दरम्यान सोलापूर शहर व जिल्ह्यात अवैध हातभट्टी निर्मिती केंद्रे, अवैध मद्य विक्री व वाहतुकीवर कारवाई करून २०० गुन्हे नोंद करण्यात आले असून २२५ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईत २४ वाहनांसह मुद्देमाल जप्त करण्यात आला. वार्षिक आकडेवारी०१ एप्रिल २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत विभागाने २३०९ गुन्हे दाखल करून २२३४ आरोपींवर कारवाई केली. यात २४८ वाहनांसह रु. ०८ कोटी ७४ लाख ९० हजार २८१ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गतवर्षीच्या तुलनेत (१९०१ गुन्हे, १५८१ आरोपी, २३७ वाहनांसह रु. ०६ कोटी ७३ लाख २१ हजार २६६ मुद्देमाल) यावर्षी गुन्हाअन्वेषणात २९.९५ टक्के वाढ झाली आहे. तसेच विभागाने अवैध मद्य विक्रीस परवानगी देणाऱ्या ४१७ ढाब्यांवर गुन्हे नोंदवून ६६९ आरोपींवर कारवाई केली आहे.

विशेष कारवाई (३१ डिसेंबर २०२५)- निरीक्षक भरारी पथक क्र.१ यांनी मौजे हिवरे, ता. मोहोळ येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर विक्रीसाठी ठेवलेला १५३ ब.लि. विदेशी मद्यसाठा, २७ ब.लि. देशी मद्यसाठा व बनावट बूचेसह रु. २ लाख ३ हजार २५० चा मुद्देमाल जप्त केला.

निरीक्षक ब विभागाने होटगी रोड, सोलापूर येथे बनावट विदेशी मद्य वाहतूक करणारे १ मोटरसायकलसह रु. १ लाख ४० हजार ३८५ चा मुद्देमाल जप्त केला. जप्त मद्य दुय्यम दर्जाचे असून त्याची तीव्रता नियमित मद्याहून ८ टक्के कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

संयुक्त कारवाई व विशेष पथकेया कारवाईत पोलिस प्रशासन, महावितरण, महसुल विभाग इत्यादींसोबत संयुक्त कारवाईवर भर देण्यात आला असून आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विशेष पथके नेमण्यात आली आहेत. सहभागी अधिकारी व कर्मचारी- उप अधीक्षक जे. एन. पाटील, निरीक्षक आर.एम. चवरे, ए.व्ही. घाटगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक एस.डी. कांबळे, राम निंबाळकर, धनाजी पोवार, सुखदेव सिद, सचिन शिंदे, समाधान शेळके, सहाय्यक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, संजय चव्हाण तसेच जवान व महिला जवान शिवानी मुढे, वाहनचालक दिपाली सलगर, संजय नवले, रशीद शेख, दिपक वाघमारे आदींनी ही कारवाई पार पाडली.

* आवाहन – अवैध मद्यविक्री, निर्मिती व वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हॉटसअॅप क्रमांक ८४२२००११३३ वर कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी सांगितले.

Tags: candidatescongressdr babasheb ambedkarElectionexcise departmentillegal liquorlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationseizedsolapur

Recent Posts

  • राज्यस्तरीय शालेय ‘तेंग सू डो’ क्रीडा स्पर्धेत उमरग्याचा डंका; २३ पदकांसह कोरले नाव
  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025