सोलापूर दि.31 : सोलापूर महानगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी शेवटचा दिवस होता. काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक आयोगाच्या नियमानुसार सर्व उमेदवारांचे A.B. फॉर्म दुपारी तीन च्या आत दाखल करण्यात आलेले आहे. परंतु दुपारी २:४५ भाजपचे नेते व शहर अध्यक्ष यांचा मुख्य निवडणूक कार्यालय नार्थकोट तांत्रिक प्रशाला सोलापूर येथे A.B. फॉर्म घेऊन आगमन झाले परंतु एकूण ७ निवडणूक कार्यालयामध्ये A. B. फॉर्म दाखल करण्यास त्यांना वेळ झाला.
दुपारी ३:०५ मिनिटांनी A. B. फॉर्म दाखल करत असताना शहर अध्यक्ष चेतन नरोटे व मित्रपक्ष यांच्या नेतृत्वाखाली तीव्र हरकत घेण्यात आली. या विषयाचे लेखी निवेदन मुख्य निवडणूक आयुक्त व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांना सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने सरचिटणीस अँड केशव इंगळे व काँग्रेसचे मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, युवक काँग्रेसचे रुपेश इंगळे यांनी या विषयीचे हरकतीचे लेखी निवेदन सादर करण्यात आले.
