सोलापूर दि. 27 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच, सोलापूर यांच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन यांचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या मागणीचे निवेदन आज सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.तसेच वन अधिकारी जाधव ताई यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही अन्यायकारक कारवाई करण्यात येऊ नये, यासाठीही स्वतंत्र निवेदन सादर करण्यात आले.
प्रशासनाने जर जाधव ताई यांच्याविरोधात कारवाई केली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंच रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि मंचचे अध्यक्ष अॅड. शताब्दीकुमार मधुकर दोडयानुर, ज्येष्ठ सदस्य अॅड. संजीव सदाफुले, अजय रणशृंगारे, उपाध्यक्ष विक्रम वाघमारे, कार्याध्यक्ष रविराज सरवदे, सचिव दीपक हुलसुरे, प्रथम गायकवाड, अॅड. राहुल गायकवाड, अॅड. जयप्रकाश भंडारे, अॅड. राजरत्न बनसोडे, अॅड. सत्यजित वाघमारे, अॅड. विशाल मस्के, राज दोडयानुर यांच्यासह विधि मंचचे अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्याय, संविधान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरोधात विधि मंच आक्रमक भूमिका घेणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
