सोलापूर, दि.१७ : सोलापूर जिल्हा पुरुष खोखो संघाच्या संघाच्या कर्णधारपदी येथील उत्कर्ष क्रीडा मंडळाच्या जुबेर शेख याची तर महिला संघाच्या कर्णधारपदी येथील किरण स्पोर्ट्स क्लबच्या सृष्टी रुपनवर हिची निवड झाली.
या संघाच्या उपकर्णधारपदी अनुक्रमे सौरभ चव्हाण (किरण स्पोर्ट्स) व समृद्धी सुरवसे (कल्याणराव काळे स्पोर्ट्स क्लब वाडीकुरोली, पंढरपूर) यांची निवड सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे सचिव उमाकांत गायकवाड यांनी जाहीर केली.
बीड येथे १८ ते २१ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ६१वी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत भाग घेण्यासाठी दोन्ही संघ रवाना झाले.
महिला संघाच्या सराव शिबिराचा समारोप वसुंधरा महाविद्यालयाचे प्राचार्य तानाजी देशमुख व स्वामी विवेकानंद प्रशालेचे प्राचार्य अंबादास पांढरे यांच्या हस्ते झाला. यावेळी सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष अजितकुमार संगवे, खजिनदार श्रीरंग बनसोडे, सहसचिव मोहन रजपूत, सदस्य संतोष कदम, पुंडलिक कलखांबकर, राष्ट्रीय खेळाडू युसूफ शेख आदी उपस्थित होते.
श्रीकृष्ण कोळी यांनी सूत्रसंचालन केले. पुरुष संघाच्या सराव शिबिराचा समारोप हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर झाला. यावेळी संघास आणि प्रशिक्षक आशिष अवधूर्ती व संघ व्यवस्थापक वैभव लिगाडे यांना उत्कर्ष क्रीडा मंडळाचे कार्याध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव अजित शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या.
