सोलापूर दि. 1 : वळसंग गावात तरूणाला आठवडी बाजारात गाठून त्याच्यावर पहिल्यांदा कोयत्याने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, त्यानंतर दगडाने ठेचून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. लक्ष्मण वसंत वाघमारे असे या तरुणाचे नाव आहे.
लक्ष्मण वसंत वाघमारे हा तरूण व्यवसायाने ड्रायव्हर होता. नेहमीप्रमाणे तो वळसंग येथील सिद्धेश्वर चौकातील आठवडी बाजारासाठी निघाला होता. यावेळी आरोपीने लक्ष्मणचा रस्ता अडवला आणि त्याला काही कळून चुकण्याआधीच आरोपीने कोयता काढून त्याच्यावर सपासप वार करायला सूरूवात झाली. या हल्ल्यात लक्ष्मण गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यानंतर आरोपीने बाजूलाच असलेला भलामोठा दगड उचलून त्याची दगडाने ठेचून हत्या केली होती. 31 डिसेंबर 2025 च्या संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली होती.
