सोलापूर दि. 3 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 23 उमेदवार स्वबळावर उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुजात आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे.
ही सभा रविवार दि. 4/1/ 2026 ला दुपारी 3 वा. न्यू बुधवार पेठ आंबेडकर उद्यानाच्या शेजारी, आयोजित केलेली आहे.
या सभेला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, हितचिंतक, समर्थक, सर्व मतदार बंधू आणि भगिनी उपस्थितीत राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
