सोलापूर दि. 7 : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतील उमेदवार यांच्या प्रचारार्थ होणार आहे. या सभेला सोलापूर शहरातील सर्व कार्यकर्ते, सर्व उमेदवार, वंचित बहुजन आघाडीचे समर्थक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे यांनी केले आहे.
या सभेची जय्यत तयारी पक्षाकडून करण्यात येत आहे. नगरपरिषद निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीला प्रचंड यश आलेले आहे. त्याचा फायदा महापालिका निवडणुकीत घेण्यासाठी राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.या सभेत प्रकाश आंबेडकर सोलापूर शहराच्या विकासासंदर्भात कोणती भूमिका मांडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्थळ : न्यू बुधवार पेठ, बस डेपोजवळ वेळ : दुपारी 4. 00 वा.
