सोलापूर दि. 18 : वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर महानगरपालिकासाठी आगामी काळात होणाऱ्या निवडणूकच्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी सोलापूरच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे मुलाखत घेण्यात आले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणुकीच्या संदर्भात सुद्धा इच्छुक उमेदवारांचे मुलाखत घेण्यात आले. तब्बल 116 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

या मुलाखाती राज्य उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा निरीक्षक सोमनाथ साळुंखे आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. नितीन ढेपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हा महासचिव अनिरुद्ध वाघमारे, युवक शहराध्यक्ष महेश जाधव, शहर महासचिव विनोद इंगळे, वंचितचे नेते रवि गायकवाड आणि शहर व जिल्ह्याचे सर्व कार्यकारणी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सोमनाथ साळुंखे यांनी निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण झाली असून वंचित बहुजन आघाडी सोलापूर महानगरपालिका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे सर्व उमेदवारांचे कागदपत्राचे काम चालू असून एकाच वेळेस सगळ्या उमेदवारांचे फॉर्म भरण्याचा विचार आहे .
सोलापूरच्या विकास करण्यासाठी सोलापूरला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक संधी सोलापूर शहरातील समजदार सुजाण विचारवंत शिव शाहू फुले आंबेडकर व संविधान वादी जनतेने वंचितला एक संधी द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
