सोलापूर दि. 3 : सम्राट चौक परिसरातील नागरिकांना तसेच येथून जाणाऱ्या परगावतील वाहनधारक नागरिकांना लघुशंकेसाठी गेले असता नरकयातना भोगावे लागतात.

या परिसरात पुरुषांना लघुशंकेसाठी एक स्वच्छतागृह आहे. परंतु सातत्याने तेथील स्वच्छता महापालिकेकडून करण्यात येत नाही. यामुळे येथील मूत्रविसर्जित केल्यानंतर जे ड्रेनेज लाईन आहे ती वारंवार तुंबले जाते.तसेच येथील स्वच्छता व्यवस्थित न केल्याने प्रवेशद्वारात ही अत्यंत घाणीचे साम्राज्य आहे.

या अस्वच्छतेला येतील परिसरातील नागरिक कंटाळलेले आहेत. तरी महापालिका आयुक्त, अधिकारी, झोन अधिकारी यांनी त्वरित लक्ष घालून स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

आम्ही ज्या ज्या वेळी लघुशंकेसाठी येतो, त्या त्या वेळी येथे अस्वच्छतेमुळे नरक यातना भोगल्याचे जाणीव होते. परंतु आजूबाजूला कोठेही सोय नसल्याने आम्हाला येथेच यावे लागते – असित कांबळे, नागरिक
