सोलापूर दि.27: सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या अनुषंगाने नामनिर्देशन अर्ज विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया सोलापूर महानगरपालिका प्रशासनामार्फत राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज शुक्रवार दि. 27 ला 1035 नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. आज एकूण 422 नामनिर्देशन अर्जांची विक्री झाली असून 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
आज दिनांक २७-१२-२०२५ रोजी २९नामनिर्देशन अर्ज दाखल –१)निवडणूक अधिकारी-१ एकूण प्राप्त अर्ज-४ (प्रभाग व जागा १अ, ३ब, ३क, ४क)२)
निवडणूक अधिकारी-२एकूण प्राप्त अर्ज-५(प्रभाग व जागा ५ अ दोन अर्ज, ६ब, ६ड, १५अ३)
निवडणूक अधिकारी-३एकूण प्राप्त अर्ज-३(प्रभाग व जागा ८अ, १४ क, १४ ड)
४)निवडणूक अधिकारी-४ एकूण प्राप्त अर्ज-६ (प्रभाग व जागा १२ब, १२क, १३क दोन अर्ज, १३ ड दोन अर्ज)
५)निवडणूक अधिकारी-५ एकूण प्राप्त अर्ज-३ (प्रभाग व जागा १७ अ, १७ ब, १८ क)
६)निवडणूक अधिकारी-६ एकूण प्राप्त अर्ज-५ (प्रभाग व जागा २० ब, २०क, २० ड, २० क दोन अर्ज)
७)निवडणूक अधिकारी-७एकूण प्राप्त अर्ज-३ (प्रभाग व जागा २२ ड, २४ड दोन अर्ज)
आज दिनांक २७-१२-२०२५ रोजी नामनिर्देशन अर्ज विक्री करण्यात आली तपशील पुढीलप्रमाणे आहे :
निवडणूक निर्णय अधिकारी -१ : ५५
निवडणूक निर्णय अधिकारी -२:५९
निवडणूक निर्णय अधिकारी-३ : ५८
निवडणूक निर्णय अधिकारी ४ : ६५
निवडणूक निर्णय अधिकारी-५ : ८०
निवडणूक निर्णय अधिकारी-६ : २३
निवडणूक निर्णय अधिकारी-७ : ८२
आज एकूण ४२२ नामनिर्देशन अर्जांची विक्री झालेली आहे.
