सोलापूर : सोलापुरात 22 वर्षीय तृतीयपंथियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आपल्या नात्यातील तरुणाशी लग्न करून आठ वर्ष माझ्यासोबत राहिला. आता सर्व विसरून मला सोडून दुसऱ्याच तरुणीसोबत विवाहबंधनात अडकत आहे, असा आरोप करत तृतीयपंथियाने आयुष्याची अखेर केली.
विशेष म्हणजे संबंधित तरुणाचा अन्य युवतीशी ‘दुसरं’ लग्न होत असताना, त्याच्या हळदीच्या दिवशीच प्रकाशने टोकाचे पाऊल उचलले.
