सोलापूर दि. 13 : सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा सोलापूर च्यावतीने अभिवादन कार्यक्रम पूज्य भंतेजी बी सारीपुत्र यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान न्यु बुधवार पेठ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर सविस्तार माहिती महाराष्ट्र संघटक शारदा गजभिये यांनी दिले.
भैया साहेबांच्या कार्याची महती सांगताना सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अण्णासाहेब वाघमारे आपल्या भाषणात म्हणाले की, भैय्यासाहेब यशवंत आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुढे नेत, बौद्ध चळवळ आणि सामाजिक न्यायासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले; त्यांनी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल यांसारख्या संस्थांमार्फत समाजाला संघटित केले, धम्मकार्यात स्वतःला झोकून दिले आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार केला. राजकीय पदांपेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिले.
यावेळी मीनाक्षी बनसोडे, विक्रम गायकवाड आदीची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुष्यमान नागसेन माने यांनी केले. कार्यक्रमास राजेंद्र माने समता सैनिक दलाचे बाबू रणखांबे रमाताई ढावरे मंगल सूर्यवंशी मंगल दोड्यानुर आम्रपाली सर्वगोड रमा शिवशरण राजू सरवदे मिलिंद सूर्यवंशी देविदास लंकेश्वर अंबादास तुपसाखरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
