सोलापूर दि. 27 : भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याच्या संघटिका शारदाताई गजभिये यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. जिल्हा संघटिका धम्मरक्षता कांबळे यांच्या हस्ते धुपदीप पुष्प वाहण्यात आले.
जिल्ह्याचे कोषाध्यक्ष दत्तात्रय सिद्धगणेश यांच्या हस्ते पुष्प वाहून जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब क्षिरसागर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. सामुदायिक राष्ट्रगीत घेऊन समता सैनिक दलाचे प्रमुख यशवंत साबळे यांच्या अधिपत्याखालील सैनिकांनी सलामी व संचलन केले.
यावेळी गौतम जगझाप, राजेंद्र बाबरे, अण्णासाहेब वाघमारे, बाबु रणखांबे, बुध्दरत्न लंकेश्वर, सहदेव सोनवणे, तुकाराम कांबळे, चेतन चौरे, गणेश कांबळे, अमर मस्के, विराज साबळे, भालेराव , मधुकर कांबळे, रमाताई डावरे, दीपक , कांबळेताई, गायकवाड ताई, आम्रपाली सर्वगोड ताई, व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
