सोलापूर दि. 9 : शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी. डी. सी. अॅन्ड ए बोर्ड) यांचेकडून घेण्यात येणारी (जी. डी. सी. अॅन्ड ए) परिक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी. एच. एम.) परिक्षा दिनांक 26, 27 व 28 में 2026 रोजी घेण्यात येणार आहे. परिक्षार्थीकडून ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रकारे या परिक्षेसाठी अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था किरण गायकवाड यांनी कळविले आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in करण्यासाठी या संकेतस्थळाचा वापर करायचा आहे. परिक्षार्थीसाठी लागणारी आवश्यक अर्हत्ता, अनुभव, आवश्यक कागदपत्रे, शुल्क, परिक्षेच्या अटी व नियम, सूट व इतर तपशीलासाठी सविस्तर अधिसुचना खात्याच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दिनांक 09 जानेवारी 2026 ते 23 फेब्रुवारी 2026 या कालावधीत करता येतील. अर्ज भरताना तयार केलेला स्वत:चा User ID व Password परिक्षार्थ्यांनी परिक्षेचा निकाल प्रसिध्द होईपर्यंत योग्य प्रकारे जतन करुन ठेवणे आवश्यक आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजाला, ई ब्लॉक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था किरण गायकवाड यांनी कळविले आहे.
