• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा

Lok Pravah by Lok Pravah
December 4, 2025
in Top News, क्रीडा, जिल्हा, तालुका
0
५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा
0
SHARES
0
VIEWS

अहिल्यानगर दि.4 : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुन्हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी साखळी सामन्यांत दमदार कामगिरीची आतषबाजी पाहायला मिळाली. मुलांमध्ये यजमान अहिल्यानगर व छत्रपती संभाजीनगर तर मुलींच्या गटात मुंबई उपनगर यांनी प्रभावी विजयांसह पुढे चाल केली.

अक्षयदादा शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठाण, विश्वंभरा प्रतिष्ठाण बुऱ्हाणनगर व बाणेश्वर क्रीडा मंडळ बुऱ्हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून ४ ते ७ डिसेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत.

मुलींच्या गटात बलाढ्य धाराशीवने परभणीवर १ डाव ३ गुणांनी विजय संपादन केला. धाराशिव संघाकडून मैथिलीने ४ मिनिट १० सेकंद संरक्षण केले. सांगलीने बीडवर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. सांगली संघाकडून स्वप्नाली तामखडे आणि श्रेया तामखडे यांनी प्रत्येकी ३ मिनिट संरक्षण केले.

सोलापूरने लातूरवर १ डाव ९ गुण राखत विजय मिळवला. सोलापूरकडून समृद्धी सुरवसेने नाबाद तीन मिनिट 20 सेकंद पळतीचा खेळ केला तर कल्याणी लांबकाणेने ४ मिनिट ४० सेकंद पळतीचा खेळ करून आक्रमणात ४ गडी बाद केले.

ठाणे संघाने सिंधुदुर्गवर २४ गुणांनी विजय संपादन केला. ठाणे संघाकडून दीक्षा काटेकर हे ३ मिनिट 20 सेकंद तर प्रणिती जगदाळे यांनी ३ मिनिट संरक्षण केले. अक्षरा भोसलेने आक्रमणामध्ये ७ गडी बाद केले. मुंबई उपनगर संघाने नांदेड वर १ डाव ६ गुणांनी विजय मिळवला. उपनगर संघाकडून दिव्या चव्हाणने ३ मिनिटे तर दिव्या गायकवाड ने ४ मिनिट १० सेकंद पळतीचा खेळ केला. तर रत्नागिरीने जालना संघावर १ डाव ९ गुणांनी (१६-७) मोठा विजय मिळवला.

पहिल्या दिवशी झालेल्या किशोरांच्या (मुलांच्या) गटातील सामन्यात धाराशिवने १ डाव ६ गुणांनी पालघरवर विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात सांगली संघाने छत्रपती संभाजी नगरचा १ डाव ६ गुणांनी पराभव केला. सोलापूरने सिंधुदुर्गवर १ डाव 21 गुणांनी विजय संपादन केला. पुणे संघाने लातूरचा १ डाव 16 गुणांनी पराभव केला. यजमान अहिल्यानगर संघाने परभणीवर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला. तर बलाढ्य ठाणे संघाने हिंगोलीवर १ डाव 18 गुणांनी मात केली. नाशिकच्या संघाने जळगाव वर १ डाव ९ गुणांनी विजय मिळवला.

Tags: ahilyanagarChampionsKho kholokpravahsolapurState

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025