• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

६१ व्या राज्य खो-खो स्पर्धा : पुरुष गटात सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली विजयी

Lok Pravah by Lok Pravah
December 18, 2025
in क्रीडा, राज्य
0
६१ व्या राज्य खो-खो स्पर्धा :  पुरुष गटात सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली विजयी
0
SHARES
0
VIEWS

बीड, ता. १८ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि बीड जिल्हा अम्युचर खो-खो संघटनेच्या आयोजनाखाली बीड येथील श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात सुरू झालेल्या ६१ व्या पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बलाढ्य संघांनी विजयी सलामी देत आपली ताकद दाखवून दिली. पुरुष गटात सोलापूर, मुंबई, पुणे, सांगली, मुंबई उपनगर, तर महिला गटात धाराशिव, पुणे, रत्नागिरी संघांनी यशस्वी सुरुवात केली.

पुरुष गट : सोलापूर, मुंबई, पुणे यांची वर्चस्वपूर्ण कामगिरीसकाळच्या सत्रात सोलापूरने नांदेडचा ४५–२० असा पराभव केला. सोलापूरकडून अजित रणदिवे (२.४० मि. संरक्षण व ४ गुण), प्रतीक शिंदे (२.२० मि. संरक्षण व ४ गुण), तर जुबेर शेख (१.१० मि. संरक्षण व तब्बल १० गुण) यांनी जोरदार खेळ केला.

मुंबईने हिंगोलीवर ५६–८ असा एकतर्फी विजय मिळवला. मुंबईकडून हितेश आग्रे (नाबाद २.२० मि. संरक्षण व ६ गुण), सम्यक जाधव (१.४६ मि. संरक्षण व २ गुण), व वेदांत देसाई (१.५० मि. संरक्षण व ४ गुण) यांची कामगिरी दमदार झाली.

पुण्याने छत्रपती संभाजीनगरचा ५३–१८ असा पराभव केला. पुण्याकडून प्रतीक वाईकर (३.२० मि. संरक्षण व २ गुण), शुभम थोरात (२.२० मि. संरक्षण) व अथर्व दहाणे (२.५० मि. संरक्षण) यांची खेळी छान झाली.

ठाणे विरूध्द पालघर सामना मध्यंतराला १५-१५ असा बरोबरीत होता. मात्र त्यानंतर ठाण्याने लौकिकाला साजेसा खेळ करत पालघरचा ४३-२९ असा १४ गुणांनी पराभव केला. ठाण्याकडून हर्षित कोळी (२.३९, २.१० मि. संरक्षण व २ गुण), शुभम डगळे (१.३० मि. संरक्षण व ६ गुण), तर पराभूत पालघरकडून निमेश कलपणे (१.५० मी. संरक्षण व ८ गुण), आकाश मठकर (१.३० व २.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी शेवटपर्यंत दमदार लढत दिली.

अहिल्यानगरने जालन्यावर ४५-१२ अशी ३३ गुणांनी मात केली. अहिल्यानगर कडून नरेंद्र तातकडे (३.१० मि. संरक्षण), पृथ्वीराज (२.५० मि. संरक्षण), विशाल दुकळे (नाबाद १.५० मी संरक्षण व ४ गुण) यांची खेळी उत्कृष्ट झाली.

पुरुष गट इतर निकाल : सांगलीने बीडचा ४०–२०, मुंबई उपनगरने सिंधुदुर्गचा ४६–२२ व धाराशिवने लातूरचा ६७–१२ असा दणदणीत पराभव केला.

महिला गट : धाराशिव, पुणे, रत्नागिरीची दमदार सलामीमहिला गटात धाराशिवने परभणीचा ५७–१० असा पराभव केला. धाराशिवकडून जान्हवी पेठे (३.२० मि. संरक्षण व १० गुण), प्रणाली (३.१० मि. संरक्षण व ६ गुण), व संध्या सुरवसे (३.१० मि. संरक्षण व ८ गुण) यांची कामगिरी बहारदार झाली.

पुण्याने सिंधुदुर्गचा ५५–१२ असा सहज पराभव केला. पुण्याकडून साक्षी करे (३ मि. संरक्षण व २ गुण), दिपाली राठोड (दोन्ही डावात नाबाद १.३०, २.२० मि. संरक्षण व ८ गुण), भाग्यश्री बडे (२ मि. संरक्षण व १० गुण). तर पराभूत सिंधुदुर्गकडून सानिया पालेकर ( ४ गुण) यांनी धमाकेदार खेळ केला.

रत्नागिरीने छत्रपती संभाजीनगरवर ४२–१४ अशी मात केली. रत्नागिरीकडून सायली कर्लेकर (२.३० मि. संरक्षण व २ गुण), ऐश्वर्या सावंत (नाबाद दोन्ही डावात २, २ मि. संरक्षण व ४ गुण), वैष्णवी फुटक (८ गुण), अपेक्षा सुतार (२.२० मि. संरक्षण व २ गुण) तर पराभूत संभाजीनगरकडून कोमल भागवत ( १.१० मि. संरक्षण) यांनी दमदार कामगिरीची नोंद केली.

महिला गट इतर निकाल : सांगलीने जळगावचा ४२–२ असा दणदणीत पराभव केला, तर सोलापूरने हिंगोलीवर सहज मात केली.चौकट : आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थितीया स्पर्धेत आंतरराष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार प्रियंका इंगळे (पुणे), अश्विनी शिंदे (धाराशिव), तसेच भारताचा कर्णधार प्रतीक वाईकर (पुणे), सुयश गरगटे (पुणे), अनिकेत पोटे (मुंबई उपनगर) हे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत खेळाडू सहभागी झाले असून, त्यामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढली आहे.

Tags: beeddr babasheb ambedkarKho kholokpravahlokpravahmediamumbaisanglisolapursolapur district sports

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025