• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोमपा सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : मतदान, मतमोजणी प्रक्रियेबाबत शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा

Lok Pravah by Lok Pravah
January 4, 2026
in Top News, जिल्हा, तालुका, माझ सोलापूर, राज्य, शहर
0
सोमपा सार्वत्रिक निवडणूक 2025–26 : मतदान, मतमोजणी प्रक्रियेबाबत शालेय मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी कार्यशाळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 4 : सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 च्या अनुषंगाने मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व त्रुटीविरहित पार पडावी यासाठी हुतात्मा स्मृती मंदिर, सोलापूर येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा उपायुक्त आशिष लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या कार्यशाळेमध्ये सोलापूर शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत शालेय शिक्षक व शिक्षिकांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांना मतदान व मतमोजणी संदर्भातील सखोल व प्रत्यक्ष उपयोगी माहिती देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

कार्यशाळेदरम्यान ईव्हीएम (Electronic Voting Machine) संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची मांडणी कशा पद्धतीने करावी, मतदान प्रक्रियेतील टप्पे, मतदार मतदान करताना अनुसरावयाची कार्यपद्धती, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी, तसेच संपूर्ण मतदान यंत्रणेची कार्यप्रणाली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

यासोबतच ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया, मशीनचा योग्य वापर, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांची कार्यपद्धती, मतदानानंतर मशीन सुरक्षितपणे सील व हस्तांतरित करण्याची प्रक्रिया याबाबतही उपायुक्त आशिष लोकरे यांनी उपस्थित सर्वांना सविस्तर व प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली.

मार्गदर्शन करताना उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले की मतदान केंद्र संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. मतदान केंद्राची पूर्वतयारी, प्रवेश व निर्गमन मार्गांची योग्य व्यवस्था, मतदारांसाठी रांगेची सोय, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक सुविधा, तसेच शांत व सुरक्षित वातावरण राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्येक मतदान केंद्रावर पीठासीन अधिकारी व मतदान अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या.यासोबतच ईव्हीएम मशीनची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली. बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांची मांडणी, मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल प्रक्रिया, मशीन सीलिंगची कार्यवाही तसेच मतदानाच्या टप्प्याटप्प्याने होणाऱ्या प्रक्रियेचे सविस्तर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

मतदानादरम्यान मतदारांची ओळख तपासणी, बोटाला शाई लावणे, सही/ठसा घेणे, स्लिपद्वारे मताची खात्री देण्याची मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षितरीत्या सील करून स्ट्रॉंगरूमकडे हस्तांतरित करण्याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.

मतदान केंद्रावर आचारसंहिता, शिस्त व निष्पक्षतेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह राहण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने नियम व सूचनांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. शिक्षक व शिक्षिका हे समाजातील विश्वासार्ह घटक असून त्यांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया अधिक सक्षमपणे राबविता येते, असेही त्यांनी नमूद केले.

सदर कार्यशाळेमुळे उपस्थित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिकांना मतदान व मतमोजणी प्रक्रियेबाबत स्पष्टता प्राप्त झाली असून आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025–26 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.

Tags: bjpcandidatescongressdr sachin ombaseElectionemployeeevmlokpravahlokpravahmedialokpravahnewsMunicipal corporationsolapurworkshop

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025