• Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
Saturday, March 28, 2026
  • Login
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण
No Result
View All Result
lokpravah.in
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

सोलापूर ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई; १६ गुन्ह्यांतील पाहिजे असलेला सराईत आरोपी जेरबंद

Lok Pravah by Lok Pravah
January 24, 2026
in Top News, जिल्हा
0
सोलापूर ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई; १६ गुन्ह्यांतील पाहिजे असलेला सराईत आरोपी जेरबंद
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 24 : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कामगिरी बजावत ०३ घरफोडी व १३ कॉपर वायर चोरी अशा एकूण १६ गुन्ह्यांतील पाहिजे असलेला सराईत आरोपी अटक केला आहे.या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसणार आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील वाढत्या मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी वेगवेगळी पथके तयार करून रेकॉर्डवरील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींवर लक्ष केंद्रीत केले.

पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के यांच्या पथकास खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अनेक गुन्ह्यांतील पाहिजे असलेला आरोपी पंढरपूर येथील एस.टी. स्टॅण्ड परिसरात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून संशयितावर नजर ठेवली. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पथकातील अंमलदारांनी शिताफीने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.चौकशीत आरोपीने आपले नाव राहूल रतिलाल काळे (वय ३०, रा. करकंब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) असल्याचे सांगितले. अधिक तपासात त्याने साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणी कॉपर वायर चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

सदर आरोपीस सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर नंबर 440/2024 (बीएनएस 303(2), 324(4)) अन्वये अटक करण्यात आली आहे.या आरोपीवर सोलापूर तालुका, करकंब, मोहोळ, वळसंग, माळशिरस, माढा, अकलुज व पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १६ गुन्हे दाखल असून तो दीर्घकाळापासून पोलिसांना गुंगारा देत होता.

ही उल्लेखनीय कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, सफौ. प्रकाश कारटकर, पोह. सलीम बागवान, मोहन मनसावाले, धनराज गायकवाड, प्रमोद शिंपाळे व योगेश जाधव यांनी यशस्वीपणे पार पाडली.या कारवाईमुळे सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, चोरीच्या गुन्ह्यांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

Tags: #arrested#crime#lokpravah#lokpravahmedia#lokpravahnews#ruralpolice#solapur

Recent Posts

  • कवठ्यात विकासाचा जागर : त्रिशिव हनुमान मंदिर सभागृहाचे भूमीपूजन; महिलांना शिलाई मशीन वाटप
  • सम्राट चौकात पाइपलाइन लिकेज; खड्डे व पाणी साचल्याने नागरिकांच्या जीवितास धोका
  • घरगुती गॅसचा अवैध वापर रोखण्यासाठी पंढरपूरमध्ये धाड; एका विरुद्ध गुन्हा दाखल
  • एपस्टीन फाईल प्रकरण : वंचित बहुजन आघाडी 16 मार्चला करणार आंदोलन
  • 𝐆𝐌 संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी अभी क्षिरसागर

Recent Comments

  1. A WordPress Commenter on Hello world!

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025

Categories

  • Top News
  • Uncategorized
  • अर्थकारण
  • कविता
  • क्रीडा
  • जाहिरात
  • जिल्हा
  • तालुका
  • देश
  • मनोरंजन
  • माझ सोलापूर
  • राजकारण
  • राज्य
  • लेख
  • विदेश
  • शहर
  • Home

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Top News
  • शहर
  • माझ सोलापूर
  • जिल्हा
  • तालुका
  • राज्य
  • देश
  • विदेश
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • राजकारण
  • लेख
  • कविता
  • अर्थकारण

© 2025