सोलापूर दि. 28 : शहरातील उत्तर सदर बाजार येथील मुर्गी नाला या ठिकाणी राहणाऱ्या अय्युब हुसेन सय्यद या तृतीयपंथी व्यक्तीचा खून झाला होता. याप्रकरणी अवघ्या सहा तासात सोलापूर शहर पोलिसांनी तपास लावून तीन आरोपींना जेरबंद केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलिसांची मदत घेऊन सोलापूर पोलिसांनी लातूर येथील रेनापुर तालुक्यातील यशराज उत्तम कांबळे, आफताफ शेख आणि वैभव घनगुले या तिघांना अटक केली.
आरोपीच्या अंगावर असलेले सोने आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने हा खून केल्याची माहिती प्रथमदर्शनी पोलिसांना तपासात निष्पन्न झाली आहे.
