सोलापूर दि.3 : महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.solapurcorporation.gov.in बांधकाम परवाना (Building Permission) व अंतिम लेआऊट मंजुरीसाठी आवश्यक विविध विभागांच्या ना-हरकत दाखल्यांसाठी (NOC) आता पूर्णपणे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने या महत्त्वपूर्ण डिजिटल सेवेला प्रारंभ केला आहे.
यामुळे बांधकाम परवाना व लेआऊट मंजुरी प्रक्रियेत लागणारी कामे अधिक पारदर्शक, सुटसुटीत व वेगवान होणार आहेत.
कोणते NOC ऑनलाईन मिळणार?
विकसकांना बांधकाम व लेआऊट प्रक्रियेसाठी आवश्यक खालील विभागांचे NOC आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील :
रस्ते विभाग (Road Department) पाणीपुरवठा विभाग (Water Supply Department) ड्रेनेज विभाग (Drainage Department) विद्युत विभाग (Electrical Department) तसेच अन्य संबंधित नागरी सुविधा विभागऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, प्राथमिक लेआऊटची मंजूर प्रत7/12 उतारा (सातबारा)पूर्वगणनपत्रक (Pre-Calculation Sheet)संबंधित जागेची KML फाइलअन्य तांत्रिक / पूरक कागदपत्रेअर्जाची स्थिती आता लॉगिनमधून पाहता येणार.
विकसक व आर्किटेक्ट यांच्या लॉगिनमध्ये सादर केलेल्या सर्व अर्जांची सद्यस्थिती ऑनलाईन पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढून वेळेची बचत होत आहे.
